इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीच्या अकोला अध्यक्षपदी राजगुरू यांची नियुक्ती

इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीच्या अकोला अध्यक्षपदी राजगुरू यांची नियुक्ती
अकोला- गोवा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीच्या राष्ट्रीय संमेलनात अकोला इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीच्या
अकोला अध्यक्षपदी सेवाभावी हेमेंद्र राजगुरू यांची नुकतीच निवड करण्यात आली या संस्थेच्या अकोला उपाध्यक्षपदी वालजीभाई पटेल, सचिवपदी मनोज भीमजीयानी,जनसंपर्क अधिकारी पदी हरिश लाखानी आदींची निवड करण्यात आली. इंटरनॅशनल प्रेस
कम्युनिटीचे गोवा येथे नुकतेच राष्ट्रीय संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तळवाडे,माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर, इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीचे
राष्ट्रीय अध्यक्ष डॉ परमिंदर पांडे, राष्ट्रीय महासचिव कृष्णा पांडे, कम्युनिटीचे गोवा अध्यक्ष ज्योति राव जळगाव जिल्हा अध्यक्ष रिकेश गांधी,मुंबईच्या महिला अध्यक्ष सरुबेन भुकिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या राष्ट्रीय संमेलनात अकोला जिल्ह्याची जबाबदारी अध्यक्ष रूपाने हेमेंद्र राजगुरू यांच्यावर सोपविण्यात आली. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडून इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीची सेवा सातत्याने सुरू राहणार असल्याची ग्वाही राजगुरू यांनी दिली. या राष्ट्रीय संमेलनात या वेळी गोवा इंटरनॅशनल प्रेस कम्युनिटीचे
पदाधिकारी राकेश शुक्ला, गोरक्षण चावला, सौ वंदना यादव, अंजू राणी शर्मा आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.ज्येष्ठ सेवाभावी हेमंत राजगुरू व त्यांच्या संपूर्ण टीमच्या या निवडीबद्दल त्यांचे डॉ आर बी हेडा, डॉ रवींद्र चौधरी, रणछोडदास राठी, दिनुभाई सोनी,विनोद धाबलिया, आशिष वखरिया, जयंत सांघवी, दीपक मायी,एड अमित लोहिया, एड राजेंद्र अग्रवाल, दिलीप जैन,डॉ बी एम मानधणे, सज्जन अग्रवाल, गोपाल अग्रवाल, सुरेश सुरेका, पन्नालाल भुतडा आदींनी अभिनंदन केले.
(सौजन्य : कृष्ण पान्डेय)

Subscribe to my channel